जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सुरक्षेसाठी मराठा प्रतिष्ठानचा पुढाकार……

सोयगाव येथे सीसीटीव्ही कॅमेरा भेट….

दैनिक युवक आधार सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे

सोयगाव:- येथे मराठा प्रतिष्ठान सोयगाव तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हाडे ,पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळेस शाळा व विद्यार्थी सुरक्षेसाठी मोठा सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आला.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी काळे,नगरपंचायतचे नगरसेवक कदीही शहा व बंटी भाऊ काळे,ॲड.योगेश पाटील,शहरातील व्यापारी प्रमोद रावणे तसेच मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे उपस्थित होते.मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे यांच्या माध्यमातून हा कॅमेरा जिल्हा परिषद कन्या शाळेस प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींची तसेच शाळेच्या परिसराची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून पालकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मराठा प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,
भविष्यातही शिक्षण व सुरक्षेसाठी असेच उपक्रम राबविण्यात येतील,असे यावेळी सांगण्यात आले.
———–
“आजच्या काळात शाळा व विद्यार्थिनींची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुली निर्भय वातावरणात शिक्षण घेऊ शकाव्यात, या उद्देशाने मराठा प्रतिष्ठानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आला आहे. शिक्षणासोबतच सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असून, भविष्यातही मराठा प्रतिष्ठान अशाच उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य करत राहील,” असे प्रतिपादन मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी केले.