ब
ुलढाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
विनोद पवार (जळगाव)
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन ऐतिहासिक बुलढाणा येथील गर्दे सभागृहात दिनांक ३० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले संघाचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगडे, राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार, प्रवीण परमार यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रमुख अतिथी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी पत्रकारांचे हक्क, सुरक्षा व सन्मान यासाठी संघाने अधिक सक्षमपणे काम करावे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकारांसाठीच्या ८ प्रमुख मागण्यांचे निवेदन माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सादर करण्यात आले. कार्यक्रमानंतर संघाच्या आगामी वाटचालीसाठी बैठक घेऊन कोअर कमिटी स्थापन करणे, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे तसेच पत्रकारांसाठी गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आले.
अत्यंत उत्साही वातावरणात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला.
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
