शेंदुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शेंदुर्णी | प्रतिनिधी
संत निरंकारी माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपा आशीर्वादाने व ‘धुळे झोन ३६’ अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने शेंदुर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, स्थळ – संत निरंकारी सत्संग भवन, शेंदुर्णी येथे होणार आहे.

शिबिराचे उद्घाटन मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. हिरालाल पाटीलजी भूषविणार आहेत. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत, गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी रक्तसाठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिक, युवक-युवती, स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात येणार आहे.