जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग क्र. १ मधून सायमा अशफाक शेख यांची भाजपकडे अधिकृत उमेदवारीची मागणी

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी… संतोष गर्दे…
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधून सायमा अशफाक शेख यांनी भारतीय जनता पार्टीकडे (भाजप) अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे.
सायमा शेख यांचे पती अशफाक शेख हे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक महानगर अध्यक्ष असून, अशफाक फाउंडेशन जळगावच्या माध्यमातून ते सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तसेच ते राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिलेले आहेत.
शिवाजीनगर व गेंदालाल परिसरात अशफाक शेख यांचा दांडगा जनसंपर्क असून, समाजातील विविध घटकांमध्ये त्यांची मजबूत ओळख आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्यामुळे परिसरात सकारात्मक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सायमा अशफाक शेख यांनी प्रभागातील महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याची ठाम भूमिका मांडली आहे. भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून लोकहितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय समीकरणांमध्ये नवे चैतन्य निर्माण होण्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
