नॅशनल लेव्हल ॲपकस स्पर्धेत यश; जालन्यातील विद्यार्थ्यांचा पवनपुत्र हॉलीबॉल संघातर्फे जाहीर सत्कार

….
सोयगाव तालुका…
प्रतिनिधी संतोष गर्दे…
…..
नॅशनल लेव्हल ॲपकस, बुलढाणा तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या जालना येथील तीर्थ रेसिडेन्सी, चौधरी नगर येथील विद्यार्थ्यांचा पवनपुत्र हॉलीबॉल संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत कुमार रुद्र बिराजदार, कुमार शिवराज भोसले पाटील, कुमार विराज अनिल चौरे पाटील तसेच बंटी दिनकर भुतेकर यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून परिसराचा नावलौकिक वाढविला.

या यशाबद्दल आयोजित कार्यक्रमात राजेश पवार सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास श्री समाधान मानटे, श्री नितीन वायाळ, शरद डोईफोडे, श्री भागवत भोसले, किशोर शिंदे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल झनके बहुरे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक आरमार, विलासराव घुले, दीपक राव बोकन, श्रीरामदास जारे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवनपुत्र हॉलीबॉल संघाचे कॅप्टन प्रकाश वाघमोडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॅप्टन श्यामजी भुतेकर यांनी केले. यावेळी कुमार नकुल खंदारे पाटील, कुमार हर्षद विष्णुपंत भोसले तसेच इतर सर्व हॉलीबॉल खेळाडूंनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक व क्रीडाप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला असून, भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक व स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.