अजिंठा लेणीत बससेवेचा तुटवडा; पर्यटक व विद्यार्थ्यांची गैरसोय
…
सोयगाव / प्रतिनिधी…
संतोष गर्दे…
….
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे देशी-विदेशी पर्यटकांसह शालेय-महाविद्यालयीन सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटक व विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.शुक्रवारीही बसअभावी पर्यटकांना दीर्घ प्रतीक्षेला सामोरे जावे लागले. सोयगाव आगाराच्या सहा बस अजिंठा लेणी मार्गावर चालविल्या जात असून या बसांना चांगले उत्पन्न मिळत आहे. तरीही वाढती गर्दी लक्षात घेऊन बससंख्या वाढविण्यात आलेली नाही.पर्यटकांच्या तुलनेत बसांची संख्या अपुरी असल्याने गैरसोय वाढत आहे. शुक्रवारी केवळ सहा बस धावल्यामुळे सहलीवर आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. येणाऱ्या काळात पर्यटक व विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन बससंख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
Related Posts
पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…
