*

पळसखेडा येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न*
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात घेण्यात आला. *विद्यार्थ्यांमध्ये ‘कमवा व शिका’* या संकल्पनेची जाणीव निर्माण होऊन त्यांना विविध व्यवसाय व व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावले होते. यामध्ये पाणीपुरी, भेळ, समोसे, गुलाबजाम, आप्पे, वडापाव, इडली, मसाला पापड, सँडविच, पॅटिस, गाजराचा हलवा, सोयाबीन फ्राय आदी खाद्यपदार्थांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने विक्री करत व्यवहाराचे धडे गिरवले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पळसखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. राजूभाऊ रेकनोद, गावचे पोलीस पाटील श्री. घोंगडे साहेब,फर्दापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.जोहरे साहेब, फर्दापूर केंद्राचे माजी मुख्याध्यापक श्री.बलांडे सर, श्री पत्रकार संतोष .गर्दे.शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. भगवान बोराडे सदस्य श्री. मनोज बेलपत्रे श्री. विशाल उबाळे, श्री.विष्णू शिनगारे, श्री.डापसे सर व शिक्षण प्रेमी आशा वर्कर श्रीमती शर्मा ताई, अंगणवाडी सेविका ताई,माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिल ठाकूर सर यांच्यासह सहशिक्षक श्री.अर्जुन पारधे सर, श्री.पंकज डव्हळे सर, श्री. वासुदेव कोळी सर, श्री.अवधूत सर, श्री.लक्ष्मण सोनवणे सर, श्री.दीपक कोष्टी सर, श्री.अमित जाधव सर, श्री. लाठे सर, श्री.रिजवान शेख सर, श्री.संजय कासार सर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बाल आनंद मेळाव्यात उपस्थितांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.