*रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी* *जगद्गुरु रामानंदाचार्य* *दक्षिण पीठ* *नाणीजधाम* ) यांच्या *पादुका दर्शन* *सोहळा*

प्रतिनिधी संतोष गर्दे
सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता स्थळ :- गट नंबर 74, सावदा फैजपुर बायपास रोड, शासकीय विश्रामगृह समोर सावदा ता. रावेर, जिल्हा जळगाव येथे आयोजन
करण्यात आले आहे. *सोहळ्याची रूपरेषा* *अध्यात्मिक* *महत्व* :- सकाळी 9:00 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखाव्यासह रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर पादुकांना संत पिठावर विराजमान करून स्वागत आरती आणि विविध मंत्र घोषाने पूजन केले जाईल. पादुका पूजन हे सदगुरु प्रति श्रद्धा आणि सन्मान व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, या सोहळ्यात वेदमंत्रांच्या उच्चाराने वातावरण भक्ती पूर्ण होईल. उपस्थित भक्तगणांना जगदगुरंच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची अलौकिक संधी मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी उपासक दीक्षा आणि गुरुपूजन संपन्न होणार असून, जास्तीत जास्त भाविकांनी उपासकदिक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा सेवा समितीतर्फे करण्यात येत आहे. **संस्थांनचे समाज उपयोगी उपक्रम* :- जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आले आहे. या सोहळ्या दरम्यान ‘ दुर्बल घटक पुनर्वसन’ या योजनेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त संस्थांच्या वतीने देहदान, अवयव दान, ग्राम स्वच्छता अभियान, इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, मोफत दवाखाना, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र आणि घरघंटी वाटप यासारखे अनेक सामाजिक नियंत्रण उपक्रमे राबविले जातात. वैद्यकीय क्षेत्रात संस्थांचे कार्य अतुलनीय,असून महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर 53 रुग्णवाहिका 24 तास अपघातग्रस्तांच्या कार्यरत आहेत. तसेच जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून 1,36,270 रक्त कुपिकांचे संकलन करण्यात आले.
जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपेच्या आणि आशीर्वादाच्या लाभ घेण्यासाठी, तसेच सिद्धपादुकांच्या दर्शनाने स्वतःला पावन करून घेण्यासाठी, जळगाव जिल्ह्यातील सर्व भाविकांनी व नागरिकांनी या सोहळ्याला सहकुटुंब, सहपरिवार,आप्तहिष्ट मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे रामानंद संप्रदाय जळगाव जिल्हा सेवा समितीतर्फे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. या महनमंगल समयी उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दिवशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
