शिंदोळ ग्रामपंचायतीची धडक कारवाई..!


प्रतिनिधि संतोष गर्दे
गावात प्लास्टिक बंदी असतानाही बहाद्दर वापरत होते प्लास्टिक पिशव्या…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत, मौजे-शिंदोळ गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत प्लास्टिक बंदीचा ठराव संमत करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने एस.आर.यमुलवाड(गटविकास अधिकारी,सोयगाव),ए.एन.दौंड(विस्तार अधिकारी पंचायत) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम अभियान प्रमुख जगदीश ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दि.१२ डिसेंबर रोजी धडक कारवाई केली.या कारवाईत एकूण ०५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गावात सर्वत्र प्लास्टिक बंदी करून कापडी पिशव्यांच्या वापरासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने दवंडी,पत्रके व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती.
तरीदेखील काही बहाद्दर हे प्लास्टिक पिशव्या वापरत होते. त्यामुळे काल सोनवणे यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीला २५०० रूपयांचा कर गोळा झाला. या कराचा वापर ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी करणार असल्याचे जगदीश सोनवणे यांनी सांगितले.
या कारवाईत ग्रामसेवक एस.पी.मोरे,रोजगार सहाय्यक दिपक तातळे,चंद्रकांत पाटील,रविंद्र शिंदे,अभिमन सोनवणे,आधार धोंगडे यांनी काम बघितले.
त्याचप्रमाणे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी देखील “गुड मॉर्निंग” पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पुरूष पथकात सुनिल सोनवणे,स्वप्निल सबगर,विपूल सोनवणे,जयदीप पाटील,योगेश पाटील,योगेश सोनवणे,भुषण तातळे, इत्यादी स्वयंसेवक काम बघतील आणि महिला पथकात छोट्याबाई मोरे,छायाबाई सोनवणे,कविता भदाणे,कलाबाई रगतवान, इत्यादी महिला काम बघतील.
