भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

सोयगाव,दि.७( प्रतिनिधी) संतोष गर्दे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैशाली पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सुरेश सरोदे,शंकर पगारे,राजेंद्र वाकेकर,विजय जाधव,योगेश बोखारे,राजू कुडके,शंकर जेठे,परमेश्वर राऊत,मनीषा जेठे,कृष्णा सुरडकर,शिवा निकम,ज्ञानेश्वर राऊत हे उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ काटोले यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी अनमोल माहिती दिली,तसेच सुरेश पगारे यांनी मनोगत व्यक्त केले.गोपाल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
सोबत फोटो –