ोथळी गावात सावकारीचे प्रमाण वाढले ; नागरिक त्रस्त,प्रशासनाची कारवाई मात्र शून्यमुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावामध्ये सावकारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गावातील काही व्यक्तींकडून दहा टक्के व्याजाने पैसे देण्याचा धंदा उघड्यावर सुरू असून, व्याज वेळेवर न मिळाल्यास नागरिकांना शिवीगाळ, धमक्या, अपशब्द वापरणे, अगदी बेस्जत करण्यापर्यंत प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार,काही सावकारांकडून जबरदस्तीने व्याज वसुली, घरात जाऊन धमक्या देणे,महिलांशी उद्धट वर्तन करणे,आर्थिक ताण वाढवून घरगुती कलह निर्माण होणे असे गंभीर प्रकार घडत आहेत.या सावकारी कारभारामागे कोणाचा राजकीय किंवा प्रभावशाली आशीर्वाद आहे का, असा मोठा प्रश्नही ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक लोक तक्रार करण्यासही घाबरत आहेत.गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या बेकायदेशीर सावकारीविरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित नागरिकांना संरक्षण देऊन गावातील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकाकडून होत आहे.