*“दानशूरतेचा आदर्श: श्री.राजेंद्र सपकाळे सर यांच्या कडून पळसखेडा शाळेला ११,१११ रुपये देणगी ”*प्रतिनिधि संतोष गर्दे जिल्हा छत्रपती संभाजीनगर
पळसखेडा: आज दिनांक: 1 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथे मित्रांच्या दुनियेतील बादशाह म्हणून ओळखले जाणारे दानशूर व्यक्ती *श्री.राजेंद्र उत्तमराव सपकाळे सर* यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज व संवाद साधला.दानशूर व्यक्ती *श्री.राजेंद्र उत्तमराव सपकाळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसखेडा येथील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी ११,१११ रुपये* अशी उदार देणगी दिली.
सर केवळ शिक्षक नव्हेत, तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, समाजासाठी आदर्श आणि उदार मनाचे प्रतीक आहेत.सरांची देणगी भावना ही सदैव समाजकेंद्री, नि:स्वार्थ आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित असते. त्यांनी दिलेला प्रत्येक हातभार हा त्यांच्या विशाल हृदयाचा, मनातील करुणेचा आणि समाजासाठीच्या बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे.त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे शाळेतील क्रीडा विभाग अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार बळकट करण्यास मोठी मदत होईल.
या प्रसंगी सर्वांचे *लाडके नेते, आदर्श शिक्षक व शिक्षक सेना तालुका अध्यक्ष श्री.रवींद्र शेळके सर* विशेष उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांचे शाळेत आगमन होताच मनमोहक स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या उदार देणगीमुळे शाळेतील क्रीडा विभागाला मोठी चालना मिळणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार अधिक बळकट होणार आहेत. सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शाळा प्रांगण उत्साहाने भरून गेले.शाळेच्या विकासातील त्यांच्या योगदानाची दखल घेत शाळेचे नूतन मुख्याध्यापक श्री.अनिल ठाकूर, शिक्षक श्री.अर्जुन पारधे सर यांच्या हस्ते श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला *तसेच कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे* जिल्हा अंतर्गत बदलीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथे रुजू झालेले *आदर्श शिक्षक श्री. अनिल ठाकूर सर* यांचे देखील शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.श्री.ठाकूर सरांच्या आगमनाने शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मान्यवरांचे मनःपूर्वक आभार शाळेतील शिक्षकवृंद श्री. वासुदेव कोळी सर, श्री. अवधूत सर,कोष्टी सर, श्री. लक्ष्मण सोनवणे सर, श्री.लाठे सर, श्री. जाधव सर, श्री. शेख सर, श्री. कासार सर यांनी मानले.