*सोयगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची तालुका बैठक उत्साहात; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव*

प्रतिनिधी संतोष गर्दे
*बहादुर चव्हाण*

*छत्रपती संभाजीनगर* सोयगाव/21 नोव्हेंबर —
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ची सोयगाव तालुका बैठक आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कार्यकर्त्यांची बांधिलकी यावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. पक्षाचा विस्तार, कार्यकर्त्यांचे संघटन आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याची दिशा या बैठकीतून देण्यात आली.

बैठकीला प्रमुख उपस्थिती :

पक्षनिरीक्षक राहुल डकले

जिल्हा सरचिटणीस नितीन धुमाळ

तालुका अध्यक्ष सुनील साखळे

युवक तालुका अध्यक्ष दशरथ झलवार

मुन्ना भाऊ ढगे

ओबीसी सेलच्या अध्यक्षा हेमा राठोड

जिल्हा उपाध्यक्ष क्षमा तडवी

शेषमल काका जाधव

सोशल मीडिया अध्यक्ष बहादुर चव्हाण

मोहन चव्हाण, पंकज थोरात, पांडुरंग थोरात, मिराबाई रवींद्र सावळे, विष्णू शिनगारे
यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बैठकीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवताना आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन मजबुतीकरणासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात आले.