*

अजिंठा घाटात थरकाप उडवणारा अपघात! आंध्र प्रदेशच्या पर्यटकाचा जागीच मृत्यू*

*संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी संतोष गर्दे
*

*छत्रपती संभाजीनगर* अजिंठा घाटात आज सकाळी भीषण अपघाताने सर्वांना हादरवून सोडले! प्रवाशांनी गजबजलेल्या घाटरस्त्यावर आंध्र प्रदेश येथील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयताची ओळख व्ही.एम.एम. कुमार मामलीपल्ली (वय 49, रा. नेहरूनगर, गुटूर, आंध्रप्रदेश) अशी करण्यात आली आहे. आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.45 वाजता अजिंठा घाटात सफरीदरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, अजिंठा येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान “मृत अवस्थेत” असल्याचे घोषित केले.

या गंभीर घटनेची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात आ.मृ.नं. 20/2025, कलम 194 BNSS अंतर्गत करण्यात आली असून तपासाची सूत्रे पोउपनी पाटील साहेब यांनी हाती घेतली आहेत.

अपघाताचे ठिकाण अजिंठा घाटापासून दक्षिणेस अवघ्या 3 किमी अंतरावर असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजिंठा घाटातील वाढत्या अपघातांमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षिततेची व्यवस्था करण्याची मागणी सुरू झाली आहे.