अजिंठा घाटात भीषण अपघात; खंडाळा येथील तरुणाचा मृत्यू……
(ता.सोयगाव) प्रतिनिधी —
संतोष गर्दे..
…….
अजिंठा घाटात झालेल्या भीषण अपघातात खंडाळा ता. सिल्लोड येथील शरीफ बाबुराव बागुल (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. १३ नोव्हेंबर २०२५) रोजी सकाळी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.३० वाजता अजिंठा घाट परिसरात अपघात झाला. यात शरीफ बागुल गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ त्यांच्या नातेवाईक अनिल बागुल यांनी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.ही माहिती ग्रामीण रुग्णालय अजिंठा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली असून, याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात आ.मृ.नं. १८/२०२५ कलम १९४ BNSS प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.घटनेचा तपास पोलीस हवालदार कोळी (मो. ८९९९५७१२६४) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोखंडे (मो. ९३७०७११९९८) करत आहेत.