*ह्रदय पिळून टाकणारा अपघात..पाच महिन्याची गरोदर महिलांचा अपघातात कार मध्ये जळून कोळसा.*


प

्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजीनगर जिल्हा
वाकोद ता जामनेर -जळगाव संभाजीनगर रोडवर वाकोद गावा लगत प्रत्येकाच्या काळजाला वेदना होईल असा अपघातात पाच महिन्याची गरोदर महिलांचा गाडी मध्ये जळून कोळसा झाला.
सविस्तर असे की जान्हवी संग्राम मोरे यांचे एक वर्षापुर्वी संग्राम जालमसिंग मोरे यांच्या शी विवाह झाला संग्राम मोरे हे मुळ बुलडाणा जिल्ह्यातील कोलमखेडा येथील रहिवासी असून बर्याच दिवसांपासून संभाजीनगर येथे राहण्यासाठी गेले होते.
आज कामा निमित्त जान्हवी मोरे हि आपल्या नवर्यासह माहेर असलेल्या बोलडा ता भुसावळ येथून संभाजीनगर येथे जात असताना वाकोद जवळ अपघात झाला.अपघात ऐवढा भिषण होता कि त्या अपघात गाडीने पेट घेतला.अगोदर संग्राम मोरे यांना काही ग्रामस्थांनी बाहेर काढले परंतू जान्हवी मोरे यांना काढयला प्रयत्न करत असताना गाडीने जोरात पेट घेतल्यामुळे त्यांचा काही मिनिटांतच कोळसा झाला.
अपघात झाल्याची माहिती मिळताच वाकोद व पाहुर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीला धाव घेतली.पहुर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे कर्मचाऱ्यांना घेऊन दाखल झाले.तसेच महामार्ग पोलिस कर्मचारी सुध्दा गस्तीवर असल्याने त्यांनीही मदत कार्य केले..
आग विझवण्यासाठी जामनेर येथील अग्निशमन दलाच्या गाडीला वेळ लागल्याने वाकोद येथील भोसले यांचे पाण्याचे ट्रॅक्टर बोलवून ग्रामस्थांनी आग विझवली.
रात्री उशिरापर्यंत पहुर पोलीस स्टेशन येये पहुर वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे.
