मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दिव्यांग बांधवांचा केला सन्मान.
प्रतिनिधी संतोष गर्दे
मौजे-शिंदोळ तालुका सोयगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील एकूण १८ पात्र लाभार्थी यांना मोफत दिव्यांग असल्याचे शासनमान्य UDID ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वार्षिक एकुण कराच्या दिव्यांग बांधवांसाठी ५% राखीव निधीतून भेटवस्तू चेदेखील वितरण ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय नियमानुसार व परिपत्रकानुसार नामे-योगेश पद्माकर जागले या दिव्यांग लाभार्थी यांना शिंदोळ ग्रामसभेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी एकमताने ठराव मंजूर केला असता त्यांच्या झेरॉक्स व ऑनलाईन सुविधा केंद्राचे देखील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले व त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे शिंदोळ गावाला विकासाची नवीन दिशा मिळत असून सामुहिक विकासाच्या दिशेने गाव अग्रेसर होत आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मैदानासाठी देखील गावातील सज्जन शक्तीला व पालकांना ग्रामनिधी/देणगीद्वारे मदत करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय व शालेय व्यवस्थापन समितीने आवाहन केले आहे.
