सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्यांनी पिकनुकसानीबाबत केली मागणी
….
सोयगाव तालुका…
प्रतिनिधी संतोष गर्दे…
सोयगाव तालुक्यातील– पळसखेडा गावातील शेतकऱ्यांनी दि. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार केली आहे. या नुकसानीबाबत सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक अर्ज सादर करून प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, सततच्या पावसामुळे कापूस, मका तसेच इतर पिकांचे उत्पादन घटले असून, आधी जाहीर करण्यात आलेली ४८ पैशांची सरासरी आणेवारी आता परिस्थितीनुसार पुनर्विचार करून सुधारित पैसेवारी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसानग्रस्त पिकांसाठी मदत जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
