सोयगाव तहसीलला ठोकले कुलूप;- सोयगाव शहरातील घटना

सोयगांव प्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजी नगर

सोयगाव;-सोयगाव सह तालुक्यात झालेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत व कर्जमाफी ची घोषणा होत नसल्याने बुधवारी( दि.२९) संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी साडे दहा वाजता सोयगाव तहसील कार्यालयाला थेट कुलूप ठोकून तालुका प्रशासनाचा व शासनाबद्दल संताप व्यक्त केला दरम्यान सकाळी साडे दाह वाजता लावलेले कुलूप दुपारी दोन वाजेपर्यंत होते त्यामुळे तब्बल चार तास सोयगाव तहसील कुलूपबंद होते
तालुक्यात आगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे दरम्यान दोन महिन्यांपासून नुकसानीची भरपाई मिळत नसून जळगाव जिल्ह्यातील शेजारच्या तालुक्याना मात्र ही मदत मिळाली मात्र सोयगावला का नाही असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान तहसीलदार हजर नसल्याने तहसीलदार कार्यालयात येईपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी घेतला होता त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना बाहेर बसून तहसीलदार यांची प्रतीक्षा करावी लागली होती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संतप्त पाचशे ते सहाशे संतप्त शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा बाजी करत थेट तहसील कार्यालय गाठून तहसील कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप ठोकले शेतकरी रविंद्र काळे, ऍड योगेश पाटील,विजय काळे,राजेंद्र काळे,राजू दुतोंडे,पूनम परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी थेट सोयगाव तहसीलला कुलूप ठोकले होते दरम्यान यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी घोषणा बाजी केली होती दरम्यान दुपारी दोन वाजता तहसीलदार मनीषा मेने या घटनास्थळी आल्यावर त्यांनी विजय काळे,ऍड योगेश पाटील, रविंद्र काळे,राजेंद्र काळे यांचेशी चर्चा करून बाधित शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम बाबत अद्याप अध्यादेश आलेला नाही याद्या अपलोड झालेल्या आहेत फार्मर आय डी काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अध्यादेश येताच अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन दिले व कुलूप उघडण्यात आले.
—सोयगाव तहसीलदार मनीषा मेने या व्ही सी साठी असल्याचे बोलले जात होते परंतु तहसील ला कुलूप ठोकून ही तहसीलदार गैरहजर होत्या त्यामुळे तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांच्या बद्दल शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला अखेरीस दुपारी दोन वाजता तहसीलदार मेने या पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत दोन दिवसात खात्यात वर्ग करा,कर्जमाफीचा शासनाने लवकर निर्णय घ्यावा, पीकविमा मंजूर करावा यासह विविध पाच मागण्यांचे निवेदन दिले यावेळी विजय काळे,ऍड योगेश पाटील, रविंद्र काळे,बंटी काळे,राजू दुतोंडे, अरुण सोहनी,पूनम परदेशीं, पुंडलिक मानकर,अनिल चौधरी, कूष्णा पाटील,अमोल मापारी,अनिल पाटील,राजू बडक,नितीन पाटील,अजय नेरपगारे,भरत काळे,दिलीप चौधरी,संतोष बोडखे,किशोर मापारी,संतोष सोहनी,जितेंद्र चौधरी,संतोष सोहनी,रामा आगे,राजेंद्र पाटील,भागवत थोटे,विजय गव्हाड,महेश चौधरी,सुरेश मनगटे,शिवाजी चौधरी,आदिसह तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.