वाकोद येथे बौद्ध स्मशानभूमी मध्ये अतिक्रमण झालेले असल्याने राजू कदम वाकोद गृपग्रामपंचायत समोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहे.

..
(प्रतिनिधी संतोष गर्दे वाकोद येथे गट नं.४२८ मधील बौद्ध स्मशानभूमी मधील तार कंपाऊंड व स्मशानभूमी नावे करणे यासाठी वाकोद येथील रहिवासी राजू कदम दिनांक २७ आॕक्टोबर सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषण करीता बसलेले आहे.दि.१५ /०९/२०२५ व १९/ ०९/२०२५ रोजी निवेदन देण्यात आले तरीही प्रशासन मार्फत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्यामुळे राजू कदम आमरण उपोषण करीता बसलेले आहे.सदर स्मशानभूमी मध्ये मुस्लिम बांधवांनी तार कंपाऊंड करीत असताना त्यांना अडवले असता.शेख शेरोद्दीन शेख मोहम्मद,शेख अमजद शेख जजहूर,शेख अकील शेख मेहबूब,शेख इमरान शेख कामिल असे दहा पंधरा व्यक्तींनी जातीवादी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.तरी बौद्ध समाजाच्या भावनांचा आदर करून त्वरीत अतिक्रमण तार कंपाऊंड काढण्यात यावे आणि स्मशानभूमी बौद्ध समाजाच्या नावे करण्यात यावे,अशी मागणी राजू कदम यांनी केली आहे