राठा उद्योजक कक्ष, जळगांव तर्फे “Gem पोर्टल” विषयावर माहितीपर सेशन
जळगांव : मराठा उद्योजक कक्ष, जळगांव यांच्या वतीने आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयातील जगदीशचंद्र बोस हॉल येथे “Gem पोर्टल” या विषयावर माहितीपर व मार्गदर्शनपर सेशन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे दिनेश पाटील सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सरकारी खरेदी-विक्रीसाठी असलेल्या Gem पोर्टलवर उद्योजक कसे सहभागी होऊ शकतात आणि उद्योगवृद्धीसाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक श्री. श्रीराम पाटील सर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एल. पी. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. संजय पाटील सर, कुतूहल फाउंडेशन व सँडे सायन्स स्कूलचे संस्थापक श्री. महेश गोरडे सर, सचिव श्री. जितू पाटील, तसेच महिला उद्योग कक्ष सदस्य सौ. सायली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या मनोगतात श्री. श्रीराम पाटील सर यांनी आजारपणातही उपस्थित राहून उद्योगविश्वातील त्यांच्या अमूल्य अनुभवांची मांडणी केली. त्यांच्या या प्रेरणादायी सहभागाबद्दल सर्वांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमात श्री. अतुल चौधरी यांनी Gem पोर्टलवरील प्रक्रिया आणि नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती दिली, तर दिनेश पाटील सर यांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती देत उद्योजकांना अधिकाधिक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महिला उद्योग कक्षाच्या सौ. सायली पाटील यांनी महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात अधिक सहभाग घ्यावा, तसेच शक्य ते सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भगवान शिंदे यांनी केले. सर्व सदस्यांनी एकत्रित परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.