
प

्रतिनिधी संतोष गर्दे
*फर्दापूर पोलिसांचा धडाकेबाज सर्च ऑपरेशन*
*शेतामध्ये उगवला ‘गांजा’, पोलिसांचा वज्र प्रहार – १९ किलो गांजा जप्त; आरोपी अटकेत*!
* *बातमी छत्रपती संभाजीनगर*
जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी धडक कारवाई पार पडली आहे. पळसखेडा शिवारातील शेत गट क्रमांक १७ मध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती मिळताच, फर्दापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री उशिरा धाड टाकत आरोपीस रंगेहात पकडले!
या कारवाईत पोलिसांनी एकूण १९.१२० किलो गांजा वनस्पती (किंमत ₹९५,६००) असा माल जप्त केला असून, आरोपी आयसखा शेकलाल तडवी (वय ६९, रा. गोद्री, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्यावर NDPS कायदा कलम 20(a)(b)(i)(ii)(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता मौजे पळसखेडा शिवारामध्ये करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तीन मोठ्या प्लास्टिकच्या गोण्या जप्त केल्या.
🔹 गोणी क्र. ०१ – ७.३८० किलो
🔹 गोणी क्र. ०२ – ७.४५० किलो
🔹 गोणी क्र. ०३ – ४.२९० किलो
👉 एकूण वजन – १९.१२० किलो गांजा!
फिर्यादी म्हणून पोह./११४४ मिरखा आलेखा तडवी (वय ४४ वर्ष, व्यवसाय – पोलीस कर्मचारी, फर्दापूर पो.ठा.) यांनी तक्रार नोंदवली असून,
तपास अधिकारी म्हणून पो.उ.नि. सी.एस. पाटील कार्यरत आहेत.
या कारवाईचे नेतृत्व पो.ह. कोळी (पो./९४९) यांनी केले.
गुप्त माहितीच्या आधारे फर्दापूर पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीस पकडले. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नामदेव रूपचंद तायडे यांच्या मालकीच्या शेतात गुप्तपणे गांजाची लागवड केली होती. त्याच्यावर गांजा विक्रीसाठी तयार ठेवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून माल जप्त केला असून,
ही कारवाई पोलीस निरीक्षक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडक छाप्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गावकऱ्यांमध्ये “फर्दापूर पोलीसांचे भुई हादरवणारे ऑपरेशन! गुन्हेगारांना आता थारा नाही!” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
फर्दापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून,
“गांजा लागवडीवर पोलिसांचा घणाघात, गुन्हेगारीविरोधात फर्दापूर पोलीस सज्ज!”
अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
