िल्लोड-सोयगांव विधानसभेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ सोहळा पार पडला. यांवेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.केशवराव पा.तायडे यांची सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार करण्यांत आला…. याप्रसंगी उपस्थित राहून मी उपस्थितांना संबोधित केले. व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे व मा.अब्दुल सत्तार साहेबांची मतदारसंघातील विजयी पताका कायम ठेवण्याचे आवाहन यांवेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले..!!