रांजणगाव येथील नाथ नगरी जयराम पार्कमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
…..
प्रतिनिधी / गंगापूर तालुका :
ज्ञानेश्वर मानमने…
……

गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील नाथ नगरी जयराम पार्क येथे पारंपरिक श्रद्धा व भक्तीच्या वातावरणात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही करण राजपूत बिडवे व ज्ञानेश्वर मानमने यांच्या पुढाकाराने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

कार्यक्रमात गुरुपूजन, आरती, भजन तसेच प्रसाद वितरणाचा समावेश होता. संपूर्ण परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.