
व

ाकोद येथील नवसाला पावणाऱ्या साखरा देवी यात्रा उत्सवाची दसऱ्याने सांगता..
… वाकोद प्रतिनिधी…. संतोष गर्दे जामनेर तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगे जवळ निसर्गरम्य ठिकाणी वाघुर नदीच्या तीरावर असलेल्या वाकोद गावात साखरा देवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
1982 मध्ये वाकोद गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ईशान्य बाजूला असलेल्या जांभूळ या छोट्या खेड्यातून देवीचे वाकोद येथे स्थलांतर करण्यात आले आहे देवीला सोन्याचे दागिने वर्ज आहेत.. त्यामुळे देवीला मानणारे भाविक सोन्याचे दागिने वापरत नाहीत अशी माहिती पुजारी किशोर इंगळे(गोसावी) यांनी दिली. जांभूळ येथे 40 वर्ष तर शेंदुर्णी जवळ असलेल्या गोंदेगाव येथे 40 वर्ष देवीचे वास्तव्य होते देवीला नवस म्हणून प्रसादाच्या स्वरूपात साखर वाटली जाते. भाविक आपल्या आयपतीप्रमाणे सव्वा किलो पासून तर सव्वा क्विंटल पर्यंत साखर प्रसाद म्हणून वाटतात संपूर्ण महाराष्ट्रात सह उत्तर प्रदेश, गुजरात,मध्य प्रदेश या राज्यातून नवरात्र उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. दरवर्षी यात्रा उत्सवात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साखरा देवी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कमीत कमी नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी असते नवस फेडण्यासाठी भाविक येतात. नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतात.या कार्यक्रमासाठी परराज्यातूनही भाविक साखरदेवी मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावतात या यात्रेचे दसऱ्याच्या दिवशी सांगता होते.
