*तांड्यावरचा मुलगा झाला डॉक्टर*
काल नुकताच बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाचा रिझल्ट लागला त्यात एकाप्रतिनिधी संतोष गर्देतांड्या वरचा शेतकऱ्याचा मुलगा *डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड* झाला गावातला पहिला पदवीधर डॉक्टर शांत, अत्यंत मेहनती वरखेडी तांडा पासून तर शहरापर्यंत सुरू झालेला त्याचा हा खडतड प्रवास *महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.* या युनिव्हर्सिटी च्या अंतर्गत असलेल्या *आदित्य आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर,बीड.* येथे त्याचं शिक्षण सुरू होता, आणि अखेर शेवट 5 वर्षाचा हा प्रवास समाप्त झाला.
तो *श्री. मोतीलाल झब्बु राठोड रा. वरखेडी बु.|| , ता. सोयगाव, जि. छ. संभाजीनगर* या एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा तो मुलगा आहे. त्याच्या कुटुंबांनी खूप काबाड कष्ट करून त्याचं शिक्षण पूर्ण केले. त्याने त्याचं परिवार किंवा कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण गावचे नाव रोशन केले आहे, त्याचा सार्थ असा अभिमान गावाला आहे.
डॉक्टर शालिक राठोड चा नुसतं वरखेडी गावातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून त्याला पुढील वाटचाली करता शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे..