📰
शेंदुर्णी सोयगाव रोड येथील स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या संडास बांधकामामध्ये ठेकेदार व संबंधित विभागाकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव स्वच्छ तेचा नारा देताना दिसत आहेत परंतु शेंदुर्णी नगरपंचायत/ ठेकेदार त्या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहे, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे.निकृष्ट दर्जाच्या संडास बांधकामामुळे प्रशासकसह स्थानिक माझी पदाधिकारी यांनी खाल्ला मलिदा ? असून, बांधकाम देखील तांत्रिक निकषांच्या विरुद्ध केले जात आहे.
सांडपाणी व्यवस्थेची योग्य सोय न करता, भिंतींमध्ये व मजल्यामध्ये कमी ग्रेडचे सिमेंट तसेच निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येताना दिसून येत आहेत. स्वच्छालय याची टाकी सेफ्टी टँक नवीन न बांधता जुन्या टाकीवरच बांधकाम करण्यात येताना दिसत आहे काही ठिकाणी बांधकाम अर्धवट सोडून दिल्याने बांधकाम चालू बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी नागरिकानी अनेकदा तक्रारी , निवेदन देऊन मोर्चा काढून सुद्धा प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
यामुळे स्वच्छतेसाठी बांधण्यात येणाऱ्या या शौचालयांचा उपयोग होण्याऐवजी ते केवळ दिखावा ठरत असून शासनाचा मागील वर्षी मंजूर झालेल्या निधीचे काम आता होताना दिसत आहे. प्रशासन यावर मूंग घेऊन बसल्यामुळे शासनाचा निधी वाया जात असल्याची टीका ग्रामस्थ नागरिक स्थानिक, रहिवासी करत आहेत. या वरील सर्व बाबींचा विचार करून तात्काळ चौकशी करावी . संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादी टाकण्यात यावे ही नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे. जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
