ट्राला ट्रक आणि कार यांच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी .
अजिंठा घाटावर घडली घटना


संतोष गर्दे
छत्रपती संभाजी नगर जिल्हा (प्रतिनिधी )
फर्दापुर छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर, अजिंठा घाटाच्या फर्दापूर टी पॉइंटच्या पहिल्या वळणावर, एका (ट्राला ट्रक) ने एका कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.हा दुर्दैवी अपघात सोमवार, १५ तारखेला रात्री ८:१५ वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणेहून जळगावला जाणारी कार क्रमांक MH 03 AW 2261, तर छत्रपती संभाजीनगरहून जळगावला आसरी भरून जाणारी ट्राला क्रमांक MH 21 BH 4916, टायर फुटल्याने (ट्रक-ट्राला) नियंत्रणाबाहेर गेली आणि कारला धडकली. अपघात इतका भयानक होता की घाटावर लावलेले कडुलिंबाचे झाडही खाली पडले आणि कारचाही चक्काचूर झाला. याच अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचा मीताली सुहास पाटिल वय 60 मृत्यू झाला. गाडीचे मालक सुहास राजाराम पाटील वय 65 आणि चालक योगेश नारायण ओसवाल वय 49 गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णवाहिकेने पहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मृत महिलेला पोलिसांच्या वाहनातून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात ट्राला कारवर आदळला ज्यामुळे कार पूर्णपणे चुराडा झाला.लोकांच्या मदतीने जखमींना आणि मृत महिलेला बाहेर काढण्यात आले यावेळी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गवर.दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येने ट्राफिक जाम झाली ही ट्राफिक तीन तास जाम झाली होती आणि दोन जेसीबी आणि किरणच्या मदतीने ट्राला ट्रक मधुन आसरी काढून जखमींना बाहेर काढण्यात आले.त्याचवेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे , पोलिस नाईक नीलेश लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल भरत कोळी, विनोद कोळी सोनोने घटनास्थळी पोहोचले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
