जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव या शाळेमध्ये माता पालक मेळावा संपन्न झाला

प्रतिनिधी:- विनोद रामजी चव्हाण

सोयगाव : ( दि .9 ) सप्टेंबर श्री . संजय शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात घेण्यात आला . प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. ज्योती स्वामी व मनिषा देसाई मॅडम होत्या , पत्रकार यासीन बेग उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पूनम खिल्लारे या विद्यार्थिनीने सुंदर असे स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची प्रास्तविक श्री शिवाजी नवले यांनी तर सूत्रसंचालन दौलतसिंग परदेशी यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री अनिल ठाकूर यांनी मानले. प्राध्यापिका ज्योती स्वामी मॅडम बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची ओळख करून त्या गुणांचा विकास शिक्षक व पालक या दोघांनी एकत्रितपणे करायला हवा . आई ही आपल्या मुलांची मैत्रीण बनली पाहिजे असेही मॅडम म्हणाल्या. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात यावा असं मनीषा देसाई आपल्या मनोगतातून म्हणाल्या. संजय शहापूरकर अध्यक्षीय मनोगतातून म्हणाले की शिक्षकांशी संवाद करून पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. याप्रसंगी जंगलात तांडा, गलवाडा, कंकराळा आमखेडा, व सोयगाव येथून बऱ्याच माता पालक उपस्थित होत्या. याप्रसंगी अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व मुलांच्या सर्वांगीण विकासा साठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे अशा भावना व्यक्त केल्या.प्रा. ज्योती स्वामी यांनी एकल पालकत्व व त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना याबाबत माहिती दिली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड, श्री एस व्ही पाटील, श्री पंकज रगडे, विद्याधर बागुल, संजय जोशी, भारद्वाज, श्री सावळे, श्रीमती राऊत, श्रीमती वाघ, श्रीमती खेडकर, श्री सचिन ढगे ,श्री आगे उपस्थित होते