*

सोयगाव तहसील कार्यालयावर हजारोंचा बंजारा समाजाचा मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार तात्काळ एस.टी. प्रवर्गाची मागणी*

प्रतिनिधी संतोष गर्दे
*छत्रपती संभाजीनगर* :
सोयगाव तहसील कार्यालयावर सोमवारी सकल बंजारा समाजाने तुफान शक्तीप्रदर्शन केले. तब्बल ३ ते ४ हजार समाजबांधव, महिला व तरुणाईच्या सहभागाने तहसील परिसर अक्षरशः दणाणून गेला.
“हक्क मिळाला पाहिजेच – अन्यथा रणसंग्राम होईल!” अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण वातावरण थरारले.
निवेदनातील मुख्य मुद्दे :
हैदराबाद मर्जर गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एस.टी. प्रवर्गात स्पष्ट उल्लेख.
२ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाला कायदेशीर बळ.
शिक्षण, नोकरी व विविध योजनांमध्ये समाज वंचित.

सर्वोच्च न्यायालयाचे इंद्रसाहनी (१९९२) व मिलिंद (२०००) निकाल समाजाच्या बाजूने.
घोषणाबाजीने परिसर दणाणला :
मोर्चात महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता. हातात फलक, कपाळावर पट्ट्या, तरुणांची आक्रमक घोषणा :
“आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवूनच राहू!”
“गॅझेट मान्य करा – नाहीतर सोडणार नाही!”
“सरकार होशात या, बंजारा समाजाला न्याय द्या!”
समाजाचा इशारा :
“सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर जिल्हाभर नव्हे तर राज्यभर रणसंग्राम पेटवू. बंजारा समाजाच्या न्यायाच्या लढाईला आता कुठलीही अडथळा मान्य होणार नाही.”
सोयगावमधील या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.