भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांची सावळदबारा परिसरात सात्वनपर भेट

सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सावळदबारा परिसरात काही अचानक घडलेल्या दुःखद घटनांमुळे परिवारांना सात्वन करण्यासाठी भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी व युवा भाजपा कार्यकर्ते राहुल राठोड यांनी भेट दिली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांच्या मोठ्या भगिनी कै. शांताबाई काळे तसेच सावळदबारा येथील पोस्टमास्तर यांच्या धर्मपत्नी कांताबाई पंजाबी यांच्या निधनानिमित्त त्यांच्या परिवारांना भेट देऊन सांत्वन केले.
परिवारांना धीर देताना ईद्रीसजी मुलतानी म्हणाले की, “तुमच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, परमेश्वर या दुःखातून तुम्हाला लवकर बाहेर काढो,” अशी प्रार्थना केली.

या प्रसंगी गावातील मित्रपरिवारासह भाजपा कार्यकर्ते भाऊराव कोलते, विनोदी टीकारे, संजय राजपूत, दीपक मानकर, रामचंद्र चिमणकर, प्रकाश शिपलकर, ज्ञानेश्वर भुसारे, पंढरी साबळे, मनोज बुढाळ, मयूर रावळकर, गजानन चव्हाण, तेजराव जाधव तसेच गावातील पत्रकार गोकुळ शिंदे राजपूत व रहीम पठाण उपस्थित होते.