देऊळगाव गुजरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा

*जळगाव न्युज नेटवर्क जब्बार तडवी*
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषांमध्ये साजरा करण्यात आला.यावेळेस मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव जनसमुदाय उसळला होता.आदिवासी संस्कृती चाली रुढी परंपरा नुसार आदिवासी पोशाख परिधान करून आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा भगवान बिरसा मुंडा, महादंड नायक विर एकलव्य,विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,तसेच खाजा नाईक, रॉबिन हूड तंट्या मामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळ्याची
सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर देऊळगाव गुजरी या गावा मध्ये मिरवणूक काढण्यात आली. या वेळेस आदिवासी गाण्यांवरती नव युवक तरुण मंडळी मोठ्या उत्साहात थिरकताना दिसून आले. या कार्यक्रमांमध्ये यावेळेस आदिवासी नृत्य कला परंपरागत वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृती परंपरागत कला नृत्य सादर करण्यात आले. या वेळेस आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान एन टीव्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर रिपोर्टर तथा दैनिक बेधडक महाराष्ट्र मराठवाडा विभागीय ब्युरो चीफ जब्बार तडवी, तसेच
जावेद तडवी,फारुख तडवी, सागर तडवी, कदीर तडवी, मोसिम तडवी, शारुख तडवी, हे बॉडी बिल्डर. तसेच पैलवान या कार्यक्रमाला उपस्थित होते. व आदिवासी तडवी भिल युवा क्रांती दल देऊळगाव गुजरी मंडळाचे पदाधिकारी युनूस तडवी, रशीद तडवी, अकील तडवी, सत्तार तडवी, मस्तान तडवी, इकबल तडवी, सरवर तडवी, व कादर तडवी, मनोर तडवी, तसेच आदिवासी समाज बांधव आणि आदिवासी महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्यात मोठा आदिवासी समाजाचा जनसमुदाय बघायला मिळाला या उत्सव सोहळ्या दरम्यान कोणती ही अनुचित घटना.
व गैरप्रकार घडू नये याची खबरदारी घेत फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळेस फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विनोद पाटील,अरुण पाटील, आकाश मोहने, विशाल विचवे यांनी चोख बंदोबस्त दिला.
