*पळसखेडा येथील समशान भूमीची दुरावस्था प्रशासन व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.*


प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव – तालुक्यातील पळसखेडा (ना धो महानोर) या गावातील समस्या काही सुटण्याचं नाव घेताना दिसत नाही आश्वासनांचा नंतर फक्त निराशाच हाती लागताना दिसत आहे.
याचाच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे पळसखेडा गावातील सार्वजनिक स्मशानभूमी याची अवस्था अत्यंत दयनीय स्थितीत आहे समशानभूमीवरची संपूर्ण पत्र सडून गेलेली आहेत बीम देखील अत्यंत जीर्ण झालेले आहेत त्यामुळे पावसाचा सरळ पाणी स्मशानभूमीत येतो त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अग्नीडाग देण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते मात्र याकडे प्रशासन ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा दिसत आहे.
या विषयावर आमचे प्रतिनिधी यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्याकडूनही काम होणार आहे काम मंजूर झालेले आहे अशा प्रकारची उडवा उडवी ची उत्तर मिळत असतात त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कोणी ऐकणार आहे का असा प्रश्न आता ग्रामस्थां समोर निर्माण झालेला आहे.
स्मशानभूमीच्या दुरावस्थेबरोबरच त्या ठिकाणी संपूर्ण गावाचा कचरा जमा होत असल्याने घाणीचे आणि दुर्गंधीचे देखील साम्राज्य निर्माण झालेले आहेत मात्र यावर देखील ग्रामपंचायत कडून कुठलीही दखल घेतली जात नाही.
या समस्येवर ग्रामपंचायत आणि प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी गावातील सर्व स्तरावरून होत आहे.
