प्रतिनिधी *राहुल सपकाळे

शेंदुर्णी दिनांक १०/१/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उत्तम दौलत कुंभार यांच्या शेतामध्ये काही मजूर काम करत होते. शेतामध्ये काम करत असताना एका तरुणी वरती वन्य प्राणी रानडुकराने गंभीर हल्ला केला. अख्तर तडवी यांची मुलगी शाईन अख्तर तडवी असं हल्ला झालेला तरुणीचं नाव आहे. शेंदुर्णी येथील भवानी नगर मध्ये आपल्या कुटुंबासह मजुरी करून उदारनिर्वाह करत असतात. शेतात मटेरियल टाकत असताना शाईन अख्तर तडवी हिच्यावर वन्य प्राणी रानडुकराने गंभीर हल्ला केल्याने तिच्या पोटाला मोठी दुखापत झालेली आहे.मजुरी करून उदारनिर्वाह चालत होता हल्यामुळे आता मजुरी देखील करणे शक्य नाही एक प्रकारे उपासमारीची वेळ या गरिब कुटुबांवरती आलेली आहे.पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना केलेली आहे.

वन्य प्राणी रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच या प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागा मार्फत करण्यात यावा अशी ही मागणी आहे.