प्रतिनिधी संतोष महाले,
आ.र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबीराचे मेनगाव येथे उत्साहात उद्घाटन
आभासी दुनियाच्या आहारी गेल्यामुळे आपण जीवनाचा खरा आनंद विसरून गेलो आहे – धनंजय येरुळे ( उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग)*
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबीराचे उद्घाटन पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री धनंजय येरुळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन पर भाषणात ते म्हणाले कि, सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला पाहिजे. आभासी दुनियेत आपण एवढे वाहून गेलो आहे की खरं जीवन जगायचंच विसरून गेलो आहे. या काळात सायबर क्राईम वाढलेला आहे. अनोळखी व्यक्तीचा फोन उचलू नये तसेच कोणत्याही लिंक ला क्लिक करू नये. यातून आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे.प्रत्येकाने सतर्क राहण्याचे आवाहन ही त्यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणुन शेंदुर्णी न. प. मुख्याधिकारी मा.श्री विवेक धांडे यांनी मार्गदर्शन करतांना पर्यावरण जागृती करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत पतंगे यांनी शिबिरात रावबिण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून मांडली. प्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन मा.श्री संजय गरुड यांनी भूषविले. युवकांना शिबिराच्या माध्यमातून श्रमसंस्कार रुजून जीवनात शिस्त लागते असे सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे सचिव मा.श्री सागरमल जैन यांनी तसेच सहसचिव मा.श्री यु. यु. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ.किरण सुर्यवंशी, रासेयो जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, मेनगाव चे सरपंच मा.श्री शरीफ तडवी, मा.श्री विलास पाटील, श्री जगदीश धुमाळ, श्री सुधाकर चौधरी, गायक पी.गणेश,श्री ए.ए.पटेल तसेच सर्व गावकरी, सर्व पत्रकार बंधू, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.रोहिदास गवारे यांनी केले तर आभार प्रा. संदिप कुंभार यांनी मानले. दुपारच्या सत्रात भडगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.एस.भालेराव यांनी शाश्वत विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे यांनी भूषविले.16 जानेवारी पर्यंत या शिबीरात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असुन यात परिसराची स्वच्छता, श्रमदान, बौद्धिक व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, विचार मंथन, आपत्ती व्यवस्थापन, कवी संमेलन, युवा संवाद, शाश्वत ग्राम विकास, बेटी बचाओ, बेटीपढाओ,शिक्षण,आरोग्य, पर्यावरण, एक भारत श्रेष्ठ भारत, डिजीटल इंडिया असे उपक्रम आयोजित केले जाणार आहे.
