प्रतिनिधी संतोष महाले,
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती. व इतर कामान मध्ये भ्रष्टाचार तसेच हेराफेरी करून लाखो रुपयांचा घोटाळा सरपंच व ठेकेदार यांनी मिलीभगत करून शासनाला लाखो रुपयांचा लावला चुना. या प्रकरणी सोयगाव पंचायत समिती कार्यालय येथे तक्रार दाखल मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली ही
सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती योजना,चौदा वित्त आयोग, तसेच पंधरा वित्त आयोग योजने च्या आलेल्या निधी मध्ये सरपंच आणि ठेकेदार यांनी मिली भगत करून लाखो रुपयांच्या कामान मध्ये हेराफेरी करून यामध्ये सरपंच यांनी पदाचा गैर वापर करून दलित वस्ती तसेच खाटीक वस्ती यांचा हक्काचा निधी गट क्रमांक 2 या शेतातील प्लॉटिंग समोर दलित वस्ती दाखवून नवीन जनरल वस्ती मध्ये सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे तर काही कामान मध्ये काम अपूर्ण असताना सुद्धा बिल मात्र पूर्ण काढण्यात आले तसेच श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी मंदिरा समोर भाविक भक्तांसाठी बनविण्यात आलेला सिमेंट रोड हा पूर्ण नित्कृष्ठ दर्जाचा बोगस रोड बनाऊन यात ही हेरा फेरी केलेली आहे आणि घोडेस्वार बाबा दर्गाह समोर सवरक्षण भिंत तसेच पाण्याचा हाऊद आणि नळाची पाईप लाईन सुद्धा अनेक दिवसांपासून धूळ खात अपूर्ण अवस्थेत पडून आहे यात ही बिल काढण्यासाठी पूर्ण तय्यारी सुरु आहे तर जिल्हा परिषद शाळेतील शौचालय व मुतारी चे बोगस नित्कृष्ठ दर्जाचे अपूर्ण काम तसेच स्वतः ग्रामपंचायत मधील शौचालय व स्नान गृहा चे पूर्ण नित्कृष्ठ दर्जाचे बोगस काम करून पूर्ण तीन तेरा वाजविले आहे या संदर्भामध्ये या कामान मध्ये घोटाळे करणाऱ्यांवरती त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी सोयगाव पंचायत समिती येथे तक्रार दाखल केलेली आहे जर लवकरात लवकर या कामांची चौकशी व कारवाई न झाल्यास महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद तर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असे निवेदन तक्रार सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या कडे देण्यात आलेले आहे मात्र अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही. भ्रष्टाचार आणि चौकशी दाबन्यासाठी चिरी मिरी देऊन हा प्रकार दाबन्याचा नेते पुढारी यांचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे या प्रकरणी पूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकरी ही करीत आहे
