जब्बार तडवी यांना
उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

एन टीव्ही न्यूज मराठी चे मुख्य संपादक इकबाल शेख यांच्या हस्ते जब्बार तडवी यांना पुरस्कार वितरित

दिनांक १२ / ८ / २०२५ रोजी अहिल्यानगर येथे एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचा २३ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व उद्घाटन या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित असलेले विधानपरिषद चे सभापती राम शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष होते. त्याच बरोबर या सोहळ्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून या सह पद्मश्री पोपटराव पवार,अहिल्या नगरचे आमदार संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपजिल्हाधिकारी गणेश राठोड, जेष्ठ विधीज्ञ ॲड.
सुभाष काकडे, व दूरदर्शनचे वार्ताहर विकास भोसले संपादक दैनिक मानदेश नगरी सोलापूर,यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या जल्लोषात थाटात संपन्न झाला. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय काम कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून त्यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार वितरित करून सन्मानित करण्यात आले. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गाव चे मुळ रहिवाशी असलेले सावळदबारा येथील रहिवाशी जब्बार दादेखा तडवी यांचे नेहमी उल्लेखनीय काम कार्य राहिलेले आहे जब्बार तडवी यांची एक निर्भीड रोखठोक निडर पत्रकार म्हणून ओळख आहे जब्बार तडवी यांनी पत्रकारिताच्या लेखणीमधून अनेक गंभीर परिस्थिती तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यांच्या विरोधामध्ये त्यांच्या पत्रकारितेच्या लेखणीमधून माध्यमातून आदिवासी, दलित, पीडित अन्यायग्रस्त, शेतकरी तसेच सर्वसामान्य पीडित जनतेला नेहमी पत्रकारितेच्या माध्यमातून घटनास्थळी ग्राउंड लेव्हल ला ग्रामीण भागातील गावे वाड्या वस्त्या व तांडे आदिवासी पाडे या ठिकाणी घटनास्थळी डोंगरदऱ्यांमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता उपस्थित राहून पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केलेली आहे जब्बार तडवी यांचे नेहमी निर्भीड रोखठोक निडर बातम्या असतात त्यामुळे अनेक अन्यायग्रस्त जनतेला व समाजाला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय काम कार्याची दखल घेऊन एन टीव्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचे सर्वे सर्वा मुख्य संपादक इकबाल शेख यांनी जब्बार तडवी यांना अ. नगर येथे नुकत्याच पार पडलेल्या २३ व्या वर्धापन दिनाच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये जब्बार तडवी यांना पुरस्काराने सन्मानित करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून सन्मानित केले केले. या भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन
एन टीव्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इकबाल शेख, अबरार शेख , अरबाज शेख, रजत दायमा यांनी केलेले होते.
जब्बार तडवी यांनी त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा
सन्मान चिन्ह ( ट्रॉफी ) पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जब्बार तडवी यांना हा सन्मान मिळाल्या बद्दल संपादक, पत्रकार, तसेच सर्वच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते, पुढारी, सामाजिक संघटना पदाधिकारी आणि गावातून गावाच्या परिसरातुन त्यांचं अभिनंदन करून मोठ्या प्रमाणातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे