
प


ळसखेडा प्रतिनिधी. .. 15 ऑगस्ट निमित्त पळसखेडा येथे चार ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून संपूर्ण गावांमध्ये घोषणा देत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.. प्रथम ग्रामपंचायत येथे राधाबाई रेकनोद. यांनी नारळ पुष्पगुच्छ अर्पण करून ध्वजारोहण केले नंतर जिल्हा परिषद शाळा येथे मनोज बडगे यांनी ध्वजारोहण केले व नॅशनल कॉलेज येथे कॉलेजचे प्राचार्य यांनी ध्वजारोहण केले तसेच सोसायटी ऑफिसचे ध्वजारोहण सोसायटीचे चेअरमन यांनी केले..या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सर्वांची उपस्थिती होती…
