
प

ळासखेड ग्रामपंचायत वतीने आरो फिल्टर कामाचे उद्घाटन…
सोयगाव तालुका….
प्रतिनिधी…. प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यातील पळासखेड गावात ग्रामपंचायत च्चा वतीने आरो फिल्टरच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच राधाबाई रेकनोद, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी गावातील नागरिक पांडुरंग थोरात, राजू रेकनोद, पंकज जैन, मनोज शेवगण, मनोज बर्डे, मंगल राजपूत, प्रफुल्ल महानोर, ईसुब बर्डे, नंदू जैन, रवि रेकनोद, सुरज कवाळ, प्रकाश शेट यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले व गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला
