
स


ोयगाव : महिला चांगल्या संस्कारांद्वारे समाजात क्रांतिकारक जन्मास घालू शकतात – जिल्हा उपायुक्त डॉ.एस एन कदम
सोयगाव येथे कन्या दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव
स्वातंत्र्य काळात महिलांनी चांगले संस्कार देऊन क्रांतिकारकांना घडवीले असल्याने देशात क्रांती झाल्याचे प्रतिपादन जिल्हा उपायुक्त डॉ.एस एन कदम (पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग) यांनी सोयगाव येथे गुरूवारी (दी.१४) केले.
हर घर तिरंगा अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोयगाव येथील पंचायत समितीच्या बचत भुवन मधे तालुका शासकीय यंत्रणेद्वारे गुरूवारी कन्यादिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी दादाराव अहिरे होते.तसेच मंचावरप्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपायुक्त डॉ.एस एन कदम (पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग), तहसीलदार मनीषा मेने, नगर पंचायत मुख्याधिकारी संभाजी देशमुख सहायक उपायुक्त रमण इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी तातेराव माळी, कनिष्ठ प्रशासनाधिकारी दीपक गावंडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सेवर मॅडम, समाजसेवक शहापूरकर संजय, सहशिक्षिका मंगला बोरसे, मंडळ अधिकारी कल्पना डिगोळे, वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे तालुका आरोग्य अधिकारी गितेश चावडा,व पशुधन अधिकारी शरद पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गलवाडा येथील जय रुदेश्वर कला मंच व शाहीर अनिल इंगळे यांनी आपल्या सुमधुर गीतातून समाज प्रबोधन केले.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोयगावची विद्यार्थिनी क्रांती गावंडे हिने कन्या दिना निमित्त लेक वाचवा संदर्भात एकपात्री नाटकाचा प्रयोग करून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.
त्यानंतर अंगणवाडी,आशा,बचत गटासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक वृक्ष,एक श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ग्राम पंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात सोयगाव तालुका अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी गर्भलिंग कायद्याची सविस्तर माहिती देत त्यातील शिक्षेची तरतूद सांगितली.देशात दर चार मुलीच्या मागे दोन मुली कुपोषित असल्याचे दुर्दैव आसल्याचेही त्यांनी सांगितले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर यांनी तालुक्यात अंगणवाडी, आशा स्वयंसेविका जनजागृतीचे महान कार्य महिला करीत असल्याचे सांगितले.
आमखेडा सरपंच नंदा संजय आगे यांनी महिलांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांना प्रोहस्तान देण्यात आल्यास त्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवतील असे सांगितले.
यावेळी शीतल सनानांसे,शोभा पवार,कविता पाटील,तलाठी महेंद्र वारकड,शंकर देवतुळे वैभव जाधव,ग्राम सेवक एस निकम, राकडे नाना,अमोल गायकवाड,क्षीरसागर,पाटील,पर्यवेक्षिका लांडगे, प्रदीप काळे,अविनाश राठोड,सागर,आदीसह विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे शेवटी सामूहिक बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका व्यवस्थापक टी. आर. बरगट यांनी तर आभार एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे सय्यद युसुफ यांनी मानले.
चौकट :
सोयगाव येथील आयोजित कन्या दिनास प्रशासना प्रमुख अधिकारी तहसीलदार मनीषा मेने यांनी स्वतः एक महिला असताना देखिल थेट कार्यक्रमाच्या समरोपला हजेरी लावल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
फोटो ओळ :- सोयगाव येथे कंन्या दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव कार्यक्रमाचे मंचावर उपस्थित मान्यवर
दुसऱ्या छायाचित्रात उपस्थीत महिला
