बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू तर…

पोलिसांची जलद कारवाई तर दोन आरोपी ताब्यात….

प्रतिनिधि संतोष गर्दे

जामनेर जिल्हा जळगाव
जामनेर शहरात काल दुपारी घडलेल्या एका वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खान वय 21, रा. छोटी बेटावद, जामनेर असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान खान हा काही
कामानिमित्त सकाळी जामनेर शहरात आला होता. दरम्यान, शहरातील एका कॅफेमध्ये काही व्यक्तींशी त्याचा वाद झाला. वाद वाढताच त्याला मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर त्याला बसस्थानकाजवळ नेऊन पुन्हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर तो गंभीर जखमी झाला.सदर तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानं तर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.