सोयगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान — शामका चव्हाण यांची दक्षता समितीवर निवड
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव – तालुक्यातील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या श्रीमती शामका प्रदीप चव्हाण यांची नांदा तांडा येथील ग्रामिण दक्षता समितीमध्ये महिला प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या दक्षता समितीमध्ये त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोड्याच दिवसांत तालुका दक्षता समितीवर देखील निवड होणार असल्याची माहिती श्री. प्रदीप चव्हाण यांनी दिली.
केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्ष शामका चव्हाण यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, “ग्रामस्तरावर महिला सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे. माझ्या कार्यकाळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
या यशाबद्दल रहीम पठाण, केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती विभाग अध्यक्ष, यांनी ताईंना हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
