सोयगाव पंचायत समितीसमोर १२ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण – विहीर व गायगोठा अनुदानाच्या अंतिम टप्प्यासाठी ग्रामस्थांची लढाई
प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय, सोयगाव येथे १२ ऑगस्ट २०२५ रोजी मंगळवारपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
अर्जदार संजय प्रभाकर काळे, आनंदा लक्ष्मण चोपडे, पांडुरंग भगवान गायकवाड, संदिप एकनाथ काळे, सिंदुबाई एकनाथ काळे (मयत), विठ्ठल एकनाथ काळे, शिवराज शालीकराम इंगळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांना पंचायत समितीकडून मंजूर झालेल्या विहिरी व गायगोठा योजनांचा अंतिम टप्प्याचा अनुदान अद्याप मिळालेला नाही.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, काही लाभार्थ्यांना पहिला टप्पा देखील मिळालेला नाही, ज्यामुळे मंजूर झालेली कामे अपूर्ण राहिली असून, शेतकऱ्यांचे सिंचन व पशुपालनाचे नियोजन बिघडले आहे.
ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघाला नसल्याने, त्यांनी १२ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
📅 दिनांक: १२ ऑगस्ट २०२५ (मंगळवार)
📍 ठिकाण: पंचायत समिती कार्यालय, सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
