हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत तिरंगा रॅली उत्साहात

फर्दापूर | जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे हर घर

प्रतिनिधी संतोष गर्दे
तिरंगा उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वज घेऊन भव्य रॅली काढली. या रॅलीत सर्व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरात हर घर तिरंगा उपक्रम राबवला आहे. त्याअंतर्गत अजिंठा येथे तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गेम स्क्वीज, भव्य रांगोळी, तिरंगा रॅली आणि सायकल तिरंगा रॅली यांचा समावेश आहे. गुरूवारी अजिंठा लेणी येथे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी तिरंगा घोषणा कार्यक्रम घेतला. त्यानंतर तिरंगा ध्वज घेऊन रॅली काढण्यात आली. शुक्रवारी हर घर तिरंगा थीमवर आधारित भव्य रांगोळी काढली जाणार आहे. शनिवारी अजिंठा टी पॉईंट ते अजिंठा लेणी दरम्यान भव्य सायकल तिरंगा रॅली होणार आहे.