ागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन.
सावळदबारा येथील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र

प्रतिनिधी संतोष गर्दे

येऊन आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला याप्रसंगी आदिवासी समाजाचे दैवत व महान हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी गावातील आदिवासी समाजाचे प्रथम सरपंच मैताब तडवी व फकीरा तडवी यांच्यामार्फत हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर या जागतिक आदिवासी दिनावर प्रा जीवन कोलते पा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की,आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव या आदिवासी व डोंगराळ तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये सावळदबारा गावांत एकत्र जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.जागतिक आदिवासी दिन दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरण संवर्धनातील प्रयत्नांसह एक चांगले जग निर्माण करण्यात आदिवासी समुदायांच्या महत्त्वपूर्ण योगदान आणि कामगिरीची ओळख पटवतो. जागतिक आदिवासी दिन किंवा जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणूनही ओळखला जाणारा हा दिवस जगभरातील आदिवासी समुदायांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची एक उत्कृष्ट संधी प्रदान करतो. असे प्रसारमाध्यमाशी बोलताना महत्त्व सांगितले याप्रसंगी सावळतबारा गावातील सर्व समाजातील बंधू-भगिनी एकत्र येऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा दिवस साजरा केला याप्रसंगी गावात वृक्षारोपणाचे सुद्धा कार्यक्रम शालेय परिसरामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये राज्जू तडवी मजीत तडवी अमजद तडवी,मनोज तडवी, प्रा परवेज तडवी , शरीफ तडवी, निरपेक्ष पत्रकार जब्बार शा तडवी, अफसर तडवी, शाहरुख तडवी, सोहिल तडवी, गफ्फार तडवी, तसेच पत्रकार गोकुळसिंग राजपूत, रहीम खा पठाण, सुनिल चोरमले, दिलीप देशमुख, जब्बर शा तडवी व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.