पुरस्कार प्राप्त शाळेचा स्नेहदीप गरुड यांनी केला सन्मान

शेंदुर्णी ता जामनेर
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २०२४-२०२५ तालुका पातळीवर या अभियान अंतर्गत आपल्या “धी शेंदुर्णी एजुकेशन सोसायटीची” शाखा असलेली “डॉ.जे जी पंडित माध्यमिक विद्यालय” लोहारा ता.पाचोरा येथील माध्यमिक विद्यालयस तृतीय क्रमांकाचे बक्षीस मागील आठवड्यात पाचोरा तालुक्याचे आमदार श्री.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
सोबत १ लक्ष रुपये राशीचा चेक देण्यात आले होते त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते स्नेहदीप गरुड यांनी शाळेला भेट देऊन मुख्यध्यापक श्री.शिंदे सर आणि सहकारी शिक्षक स्टाफ चे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.