सोयगाव; वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कुमारी क्रांती निलेश गावडे या विध्यार्थीनीचा सोयगाव शिक्षक मित्र परीवारा कडून सत्कार

प्रतिनिधी
संतोष गर्दे
सोयगाव,दि.१६( प्रतिनिधी )
कै.शिवराम बहुद्देशु शिक्षण संस्था संचलित साईराज इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जेऊर तालुका कन्नड यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थीनी कु.क्रांती निलेश गावडे हीने प्रथम क्रमांक करून १११११/-रूपये व सन्मान चिन्ह बक्षीस प्राप्त केल्याबद्दल सोयगाव शिक्षक मित्र परीवारा कडून कु.क्रांतीचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी फर्दापुर केंद्राचे केंद्रप्रमुख मोतीराम जोहरे,जंगलातांडा येथील मुख्याध्यापक रामदास फुसे,कै. बाबुरावजी काळे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन योगेश बोखारे,शाळेचे मुख्याध्यापक झगाजी पोतरे,रामजीनगर येथील मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,वेताळवाडी मुख्याध्यापक नितेश गवादे,महादू पंडीत,प्राध्यापक निलेश गाडेकर,केदारनाथ खताळ,जांभुळकर व क्रांतीचे पालक उपस्थित होते.
सोबत फोटो –