प्रतिनिधी संतोष महाले

शेंदुर्णी (वार्ताहर) – येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी ,पालक, शिक्षक संपर्क अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 धोरणातील बदल यासंदर्भात माध्यमिक विद्यार्थी विदयार्थीनींना मार्गदर्शन अप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.प्रशांत देशमुख सर यांनी केले .

यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील महत्वपूर्ण बदल व विद्यार्थी जीवन कौशल्य आधारीत रोजगाराभिमुख वाटा यावर मार्गदर्शन करण्यात आले .

यावेळी वाणिज्य विभाग उपप्राचार्य प्रा. श्याम साळुंखे सर व प्राध्यापिका योगीता चौधरी यांची उपस्थिती होती .या उपक्रमाचे डॉ .हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्षा डॉ.कौमुदी साने , संचालक डॉ.कल्पक साने तसेच प्राथमिक शाळा मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर यांनी प्रशंसा केली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका श्रीमती मिराबाई इंगळे यांनी केले . तर आभार प्रगटन उपशिक्षक प्रमोद सरोदे सर यांनी केले .