प्रतिनिधी संतोष महाले
धी शेंदुर्णी एज्यु.को-ऑप सोसा. संचलित, अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी ,पालक, शिक्षक संपर्क अभियानांतर्गत दि. नऊ जाने .गुरुवार रोजी आप्पासाहेब र.भा.गरुड कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये, अ.र.भा. गरुड कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 धोरणातील बदल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.संजय भोळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आप्पा महाजन,उपप्राचार्य प्रमोद सोनवणे आणि वाणिज्य विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रो. शाम साळुंखे, इतिहास विभाग प्रमुख प्रो .प्रशांत देशमुख डॉ.आजिनाथ जीवरग, श्रीमती छाया पाटील, प्रा. संदीप कुंभार सर, प्राध्यापक मुकेश पाटील सर ,प्रा. योगेश चौधरी , प्रा .रिना पाटील, शप्रा वर्षा लोखंडे , प्रा शुभांगी चौधरी ,यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाणिज्य विभाग प्रमुख प्रो.श्याम साळुंखे यांनी प्रोजेक्टर
द्वारे प्रेझेंटेशन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात संबोधित केले. NEP-2020 शालेय शिक्षण संरचनेतील बदल ५+३+३+४ हे शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. NEP-2020 अंमलबजावणी FYUG (चार वर्ष पदवी)काय आहे? त्यात असलेली लवचिकता आणि बहुशाकीय,
अनुभवातधिष्ठीता , अभ्यासक्रम,प्रयोगात्मक शिक्षणावर भर ,क्षमता विकास विषय,भारतीय ज्ञान प्रणाली उद्दिष्ट,उदाहरणे फायदे, आंतर विद्याशाखीय विषयांना प्राधान्य, ईंटरशिप प्रकल्पासह अभ्यासक्रम ,एकावेळी दोन पद्धती अभ्यासक्रम, एकाच वेळी दोन पदवी शिक्षण घेण्याची सुविधा,ऑनलाइन अभ्यासक्रम,योजना उच्च अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्कॉलरशिप लाभ, आर्थिक सहाय्यता योजना अशा वेगवेगळ्या योजना विद्यापीठांद्वारे राबवणे याची उपप्राचार्य श्याम साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर ईंतंभूत अशी माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.आजीनाथ जीवरग यांनी केले तर आभार प्रा. दिपक पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला कनिष्ठ विभागातील महाविद्यालयातील 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

