शेंदुर्णी व परिसरात शासन व पोलीस प्रशासनाने ठरवुन दिलेले नियम व केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज गणपती बाप्पा ला अतिशय साध्या पद्धतीने व जड अंतःकरणाने पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत भावपुर्ण निरोप दिला.
नगरपंचायतीच्या वतीने श्री चे गणेश विसर्जनासाठी शेंदुर्णीत कृत्रिम तलाव व निर्माल्य संकलनची व्यवस्था केली.नागरिकांनी प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती पीओपीच्या असल्याने त्या पाण्यात लगेचच विरघळत नाहीत. विसर्जनानंतर मूर्तीची विटंबना होते. यासोबतच नदी व पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. या पार्श्वभूमीवर शेंदूर्णीत श्रीगणेश विसर्जनाची तयारी न. प. ने केली होती. त्यासाठी न. प. कार्यालय जवळ कृत्रिम तलाव व निर्माल्य संकलन कलश तयार करण्यात आले होते. तसेच जमा होणाऱ्या निर्माल्य यातून शेंदुर्णी न. प. द्वारे खत निर्मिती करण्यात येणार आहे. संकलन केलेल्या गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात येईल.
सर्वांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणपुरकच बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करत पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करावी.
शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत उभारलेल्या कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री विवेक धांडे यांनी केले होते. यास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला..
